काश्मीरमध्ये युवक ठार

By Admin | Updated: September 24, 2016 06:03 IST2016-09-24T06:03:00+5:302016-09-24T06:03:00+5:30

पीडीपीचे संस्थापक सदस्य तारिक हमीद कर्रा यांनी शुक्रवारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Youth killed in Kashmir | काश्मीरमध्ये युवक ठार

काश्मीरमध्ये युवक ठार


श्रीनगर : काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दगडफेक करणाऱ्या जमावावर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात शुक्रवारी एक युवक ठार झाला. शुक्रवारच्या नमाजनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती असल्यामुळे पोलिसांनी श्रीनगरच्या अनेक भागांत आज संचारबंदी लागू केली होती. याशिवाय जमावबंदीचे आदेशही लागूच होते.
खासदाराचा राजीनामा
पीडीपीचे संस्थापक सदस्य तारिक हमीद कर्रा यांनी शुक्रवारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काश्मिरातील हिंसाचार थांबविण्यासाठी संसदेने कोणतीही ठोस पावले न उचलल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Youth killed in Kashmir