युवक काँग्रेसची किसान यात्रा उद्या सोलापुरात

By Admin | Updated: June 26, 2015 01:05 IST2015-06-26T01:05:38+5:302015-06-26T01:05:38+5:30

सोलापूर : केंद्र सरकारने केलेला भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित किसान संदेश पदयात्रेचे २७ जून रोजी सोलापुरात आगमन होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस निरीक्षक रुत्विज जोशी यांनी दिली.

Youth Congress's Kisan Yatra tomorrow, in Solapur | युवक काँग्रेसची किसान यात्रा उद्या सोलापुरात

युवक काँग्रेसची किसान यात्रा उद्या सोलापुरात

लापूर : केंद्र सरकारने केलेला भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित किसान संदेश पदयात्रेचे २७ जून रोजी सोलापुरात आगमन होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस निरीक्षक रुत्विज जोशी यांनी दिली.
प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ४२ लोकसभा मतदारसंघातून १७00 किलोमीटर काढण्यात येणारी ही रॅली १00 दिवस चालणार आहे. २७ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे या पदयात्रेचे आगमन होणार आहे. सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे हे पदयात्रेचे स्वागत करणार आहेत. २८ जून रोजी सकाळी ९ वा. ही पदयात्रा सोलापुरात शिवाजी चौकात पोहोचेल. शहरातील विविध भागातून ही पदयात्रा जाईल. सायंकाळी पदयात्रेचा समारोप काँग्रेस भवन येथे होणार आहे.

Web Title: Youth Congress's Kisan Yatra tomorrow, in Solapur