शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 9:52 AM

यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील वक्तव्याने भाजप नेते दिलीप घोष यांची अडचण वाढली आहे. यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे. 

"आपण केलेले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या परंपरेविरुद्ध आहे. पक्ष अशा वक्तव्यांचा निषेध करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार या संदर्भात आपण लवकरात लवकर खुलासा करून योग्य ती कार्यवाही करावी," असे भाजपने नोटीस जारी करत म्हटले आहे. 

TMC ची ECI कडे तक्रार -भाजप नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. ममता बॅनर्जी स्वतःला कधी गोव्याची कन्या म्हणवतात तर कधी त्रिपुराची कन्या म्हणवतात. त्यांनी त्यांचे खरे पिता कोण आहेत हे सांगावे. कुणाचीही कन्या होणे योग्य नाही, असे दिलीप घोष यांनी म्हटले होते. यानंतर, त्यांचे हे वक्तव्य महिलांच्या अस्मितेशी जोडत टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते घोष - कीर्ती आझाद यांच्यासंदर्भात बोलताना दिलीप घोष ममता बॅनर्जींवर घसरले. "कीर्ती आझाद दीदींचा हात धरून आले, आता त्यांचे पाय थरथरत आहेत. आझाद यांना त्यांच्याच लोकांकडून दूर ढकलले जाईल. बंगालची जनता त्यांना कधी दूर ढकलून देईल हे त्यांनाही समजणार नाही," असे घोष म्हणाले. याचवेळी, घोष म्हणाले, "बंगालला आपला पुतण्या हवा आहे. मुख्यमंत्री गोव्यात जाऊन म्हणाल्या, मी गोव्याची कन्या आहे. त्रिपुरात म्हणाल्या, मी त्रिपुराची कन्या आहे. त्यांनी सर्वप्रथम हे निश्चित करायला हवे की, त्यांचे वडील कोण आहेत? कुणाचीही कन्या होणे योग्य नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगTrinamool Congressतृणमूल काँग्रेस