तरुणीचा भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप, आत्महत्या करण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:19 IST2018-05-07T12:16:58+5:302018-05-07T12:19:41+5:30

न्याय न मिळाल्यास आत्महत्या करेन असा इशारा यावेळी पीडित तरुणीने दिला आहे. 

young woman accused of sexually assaulting a bjp leader | तरुणीचा भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप, आत्महत्या करण्याचा दिला इशारा

तरुणीचा भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप, आत्महत्या करण्याचा दिला इशारा

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका तरुणीने भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितीने गाजीपूर पोलिस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पीडितेने भाजपा नेता आणि उच्च न्यायलयाचे अधिवक्ते सतिश शर्मा यांच्यावर मागील तीन वर्षांपासून बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे.  

लखनऊतील प्रेस क्लबमध्ये येथे पीडित तरुणीने आज पत्रकार परिषदेत घेत हा खुलासा केला आहे. यावेळी पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना धमकावत असल्याचाही आरोप सतिश शर्मा यांच्यावर केला आहे. मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास दिल्यास पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा इशारा यावेळी दिला. पीडित तरुणीने न्याय न मिळाल्यामुळं या पत्रकार परिषदेत स्वता:चे केस कापत भाजपा नेत्याचा निषेद केला. तक्रार दाखल करुनही पोलिसांनी शर्मा यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे. 



 

पीडित तरुणी सतीश शर्मा यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी कोर्टात एकत्र काम करत होती. पीडिता सतीश शर्मा यांची सहकारी होती.  यावेळी शर्मा यांनी तरुणीचा अश्लिल व्हीडिओ बनवत ब्लॅकमेल केले. गेल्या तीन वर्षापासून शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये तरुणीने कात्री घेत स्वत:चे केस कापण्यास सुरुवात केली होती. जमलेल्या पत्रकारांनी विनंती केल्यानंतर ती शांत झाली. मला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करेन असा इशारा यावेळी पीडित तरुणीने दिला आहे. 

Web Title: young woman accused of sexually assaulting a bjp leader