तरुणाने वडिलांची हत्या करुन केले शरिराचे तुकडे

By Admin | Updated: May 31, 2016 10:21 IST2016-05-31T10:21:20+5:302016-05-31T10:21:20+5:30

आपल्याच वडिलांची गोळी घालून हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणांवर टाकल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे

Young man slaughtered father's father | तरुणाने वडिलांची हत्या करुन केले शरिराचे तुकडे

तरुणाने वडिलांची हत्या करुन केले शरिराचे तुकडे

>ऑनलाइन लोकमत - 
केरळ, दि. 31 - आपल्याच वडिलांची गोळी घालून हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणांवर टाकल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. 36 वर्षीय शेरिन जॉन आयटी कंपनीत कामाला असून त्याने आपल्या 68 वर्षीय वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी शेरिनला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
जॉन गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेत राहतात. केरळमधील आपल्या पुर्वजांच्या घरी आले असता त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेरिनने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी शोधमोहिम करुन शरिराचे तुकडे गोळा केले आहेत. 'शरिराचे तुकडे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. आम्ही केलेल्या चौकशीतून संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आमचा अंदाज आहे', असं पोलिसांनी सांगितलं आहे. 
 
जॉन गेल्या बुधवारपासून बेपत्ता होते. शेरिनसोबत एसी रिपेअरिंगसाठी गेले असता ते बेपत्ता झाले आहेत. आपले पती आणि मुलगा परत न आल्याने जॉन यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान शेरिनने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी हत्येचा तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Young man slaughtered father's father