शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

गोवंश प्राण्यांच्या मृत्युने CM योगी नाराज, 8 अधिकाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:44 PM

योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेश- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गोवंश प्राण्यांचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाराज झाले आहेत. याप्रकरणी अयोध्या आणि मिर्झापूर जिल्ह्यातील 8 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री उशिरा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे संवाद साधला. तसेच प्रयागराजचे आयुक्त यांनाही वीज पडल्याने दगावलेल्या गोवंशच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  

योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतल्यानंतर, मिल्कीपूरचे बीडीओ, पशु आरोग्य अधिकारी मिल्कीपूर, ग्रामपंचायत अधिकारी पलियामाफी, मिल्कीपूर आणि प्रभारी कांजी हाऊस अयोध्यानगर डॉ. उपेंद्र कुमार आणि डॉ. विजेंद्र कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर, अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.   उत्तर प्रदेश आवास योजना, लखनौ विकास प्राधिकरण आणि नगर निगम लिमिटेड यांनी संयुक्तपणे अभियान राबवावे. त्यानुसार, अमौसी विमानतळापासून अर्जुनगंज, शहीदपथ आणि शहरातील विविध ठिकाणाच्या निराश्रित गोवंश प्राण्यांना पशु आश्रित स्थल कान्हा उपवन येथे सुरक्षितपणे ठेवण्याचे बजावले आहे. तसेच हे अभियान सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे. तसेच, मिर्झापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एके. सिंह, प्रभारी अधिशासी अधिकारी नगरपालिका मुकेश कुमार आणि नगर अभियंता रामजी उपाध्याय नगरपालिका मिर्झापूर यांचे निलंबन केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी गोवंश प्राण्यांची काळजी, आरोग्य, उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गोवंश प्राण्यांची संख्या लक्षात घेऊन शेड उभारण्याचेही सांगितले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेश