शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथांनी यूपीला पाकिस्तान होण्यापासून वाचवलं - साध्वी प्राची

By admin | Updated: April 3, 2017 14:24 IST

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यामुळे उत्तर प्रदेश ‘दुसरं पाकिस्तान’ होण्यापासून वाचला आहे, असे विधान साध्वी प्राची यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणा-या साध्वी प्राची यांनी पुन्हा केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यामुळे उत्तर प्रदेश ‘दुसरं पाकिस्तान’ होण्यापासून वाचला आहे, असे विधान साध्वी प्राची यांनी केले आहे.  योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. 
 
पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी प्राची म्हणाल्या की,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी केवळ जनतेमध्ये आनंद आणि उत्साहच निर्माण केला नसून राज्याला दुसरे पाकिस्तान होण्यापासून बचावले आहे.  दरम्यान काही दिवसांपूर्वीच, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातील कामांच्या चौकशीचे योगी आदित्यनाथ यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. योगींच्या या निर्णयाचं साध्वी प्राचींनी कौतुकही केलं आहे. तत्कालीन यादव सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी झाल्यास लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. शिवाय, होणा-या चौकशीमुळे समाजवादी पक्षाची झोपच उडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
(अत्याचाराविरोधात CISF च्या 200 जवानांची उच्च न्यायालयात धाव)
साध्वी प्राची नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर त्यांनी बसच्या सर्वेसर्वा मायावती यांना टार्गेट करत त्या वेड्या असल्याची टीका केली होती. निवडणुकांमध्ये दणदणीत पराभव झाल्यानंतर मायावती यांनी ईव्हीएममध्ये गौंडबंगाल असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना साध्वी प्राची यांनी मायावती यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मंत्री आणि नेतेमंडळींना वाद निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ न देण्याचं आवाहन केलं होतं.