Yogendra Yadav : "अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:12 PM2022-08-24T15:12:49+5:302022-08-24T15:22:50+5:30

Yogendra Yadav : आपचे (AAP) माजी नेते योगेंद्र यादव यांनी दिल्लीतील मद्य धोरणावरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले आहे.

Yogendra Yadav breaks silence on aap leader viral video says it is true | Yogendra Yadav : "अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..."

Yogendra Yadav : "अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..."

Next

नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. आपचे (AAP) माजी नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी दिल्लीतील मद्य धोरणावरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले आहे. त्यांनी परमजीत कात्याल यांच्या एका जुन्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत याबाबत माहिती दिली आहे. मला या घटनेची माहिती आहे. योगेंद्र यादव यांनी ट्विट करून याबाबत आता सांगितलं आहे. अरविंद केजरीवालांनी नितीन गडकरी यांच्या नावे आपल्या आमदारांना फोन केले होते असं म्हटलं आहे. 

"परमजीत यांनी मला या घटनेची माहिती 7 वर्षांपूर्वी दिली होती. त्यानंतर मी चौकशी केली असता त्यांचे म्हणणे पूर्णपणे खरे असल्याचे आढळले. अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार डिसेंबर 2013 मध्ये त्यांच्याच आमदाराला भाजपाच्या नावाने फोन करण्यात आले. अशा कृत्यांमुळे आमचा आप नेतृत्वावर भ्रमनिरास झाला होता. मद्य धोरणावरून आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी रात्री ट्विटरवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला. त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. 

अमित मालवीय यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून चौकशीचे आदेश दिल्यानंतर नवीन मद्य उत्पादन शुल्क धोरण का मागे घेण्यात आले? याचे स्पष्टीकरणही मागितले आहे.मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर "जर अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना पद्मविभूषण, सिसोदिया यांना भारतरत्नसाठी आणि स्वत:ला ऑस्करसाठी नामांकित केले, तर त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर लगेचच नवीन दारू उत्पादन शुल्क धोरण का उलटवण्यात आले. यासाठी किती लाच घेण्यात आली. दिल्ली सरकारचे एकूण नुकसान किती झाले?" असे प्रश्न विचारले आहेत. 

अमित मालवीय यांनी एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जो आपचे माजी सचिव परमजीत कात्याल यांचा आहे. या व्हिडीओमध्ये ते अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी भाजपाकडून आपचे 35 आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. परमजीत कात्याल यांनी दावा केला की, मला आणि इतरांना अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांसारख्या वरिष्ठ भाजप नेत्यांच्या नावाने 'आप'च्या आमदारांना पैशाच्या बदल्यात पक्ष सोडण्याची ऑफर देण्यास सांगण्यात आले होते. कात्याल म्हणाले, "मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही टीव्हीवर अरविंद केजरीवाल यांना भाजपा त्यांच्या आमदारांना बोलावून त्यांना विकत घेऊन 35 लाख देऊ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले तेव्हा मला समजले की मी काहीतरी चुकीचे करत आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Yogendra Yadav breaks silence on aap leader viral video says it is true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.