शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचे गुण वाढविणार्‍या लिपिकावर गुन्हा दाखल उमवि : गुणात खाडाखोड करुन परिक्षकाची केली बनावट स्वाक्षरी

By admin | Updated: May 20, 2016 00:41 IST

जळगाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्‍या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण (वय ५७ रा.दादावाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

जळगाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्‍या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण (वय ५७ रा.दादावाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
संतोष चव्हाण हा विद्यापीठात परीक्षा विभागात वरिष्ठ लिपिक आहे. त्याचा मुलगा स्वप्नील हा मू.जे.महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत मुलगा स्वप्नील याला १५ गुण मिळाले होते. चव्हाण यांनी २८ मार्च ते १५ मे २०१६ या दरम्यान कार्यालयीन वेळेत उत्तर पत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. या काळात चव्हाण यांनी स्वप्नीलच्या गुण पत्रिकेत खाडाखोड करुन १५ वरुन ४५ गुण केले व परीक्षक वाय.पी.पाटील यांची बनावट स्वाक्षरी केली. परीक्षा विभागातील घोलप नावाचा कर्मचारी रजेवर असल्याने त्यांनी चव्हाण यांच्या ताब्यात उत्तरपत्रिका सोपविल्या होत्या.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुलगुरु प्रा.डॉ.सुधीर मेश्राम यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर उपसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण यांनी पाळधी दूरक्षेत्र गाठून सहायक निरीक्षक विजय देशमुख यांची भेट घेवून फिर्याद दिली आहे. चव्हाण यांच्याविरुध्द कलम ४२०, ४६४, ४६५ व ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. तपास शामकुमार मोरे व अतुल वंजारी करीत आहेत.