'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

By मोरेश्वर येरम | Published: November 29, 2020 10:52 AM2020-11-29T10:52:08+5:302020-11-29T10:57:20+5:30

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

Work from home has made workday of Indians 32 minutes longer | 'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

Next
ठळक मुद्दे'वर्क फ्रॉम होम'मुळे काम आणि घर यांची सरमिसळ झालीवर्क फ्रॉम होममुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचं निष्पन्नइस्राइलमध्ये कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक कामाचे तास वाढले

नवी दिल्ली
घाईघाईत जेवण करणं असो किंवा मग न संपणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचे हे पुरावे कमी वाटत असतील तर आता एक अहवाल प्रसिद्ध झालाय यातून भारतीयांच्या कामाच्या तासांत वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे. यात इस्राइल सर्वात आघाडीवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्याच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात इस्राइलमधील नागरिकांनी दिवसाला सरासरी ४७ मिनिटं जास्त काम केलं. तर भारतीय नागरिकांनी दररोज सरासरी ३२ मिनिटं जास्त वेळ काम केल्याचं अहवालात नमदू करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही हेच प्रमाण आहे. 

'वर्क फ्रॉम होम'मुळे लांबचा प्रवास टळला असला तरी त्याचा फायदा होतोय अशातलाही काही भाग नाही. हैदराबाद स्थित आयटी कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असलेले पुनीत श्रीवास्तव म्हणतात की, "लॉकडाउनच्या आधीच्या वर्क फ्रॉम होममध्ये एक सुसंवाद होता. त्यावेळी घरची कामं संपवून डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत होता. पण आता मी घरी लॅपटॉपला खिळून असतो. व्हिडिओ मिटिंग्जसाठी कोणत्याही वेळी आम्हाला उपलब्ध राहावं लागतं." 

वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक काम करत असून दुपारी सर्वात कमी काम होत असल्यांचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. घरातून काम करण्याची मुभा असल्यानं अनेक जणांनी कामात विश्रांती घेऊन पुढे कामाच्या तासांत वाढ होण्याचं अंगवळणी पाडून घेतलं आहे. त्यामुळे घर आणि ऑफीस अशा दोन गोष्टी कर्मचाऱ्यांना वेगळ्या राखता येणं कठीण होऊन बसलं आहे. इतकंच नव्हे तर घरातील अद्याप कोणतीही जबाबदारी नसलेल्यांनाही कामातून स्वत:साठीचा वेळ काढणं कठीण झालं आहे. काहीजण कोणतीही ब्रेक न घेता सलग काम करत आहेत. कोरोना काळात कामाच्या सीमा निश्चित करणं आता कठीण होऊन बसल्याचं अनेकांचं मत आहे. तर २३ टक्के लोक काम संपल्यानंतर आपल्या वैयक्तिक वेळेतही कामाचाच विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 

Web Title: Work from home has made workday of Indians 32 minutes longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.