शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:54 IST

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठळक मुद्देया संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजेअशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतातमात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्य दलांमध्ये निर्माण झालेला तणाव सध्या जैसे थे आहे. मात्र सीमेवरील तणावामुळे दिल्लीतील राजकीय वातावरणही सध्या तापलेले आहे. लडाखमधील चिनी घुसखोरीवरून आरोपांच्या फैरी झाडून काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकारला जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

गलवान विवादावर ट्विटरव दिलेल्या प्रतिक्रियेत मायावती म्हणाल्या की, ‘’हल्लीच १५ जून रोजी लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारताच्या कर्नलसह एकूण २० जवानांना वीरमरण आले आहे, या घटनेमुळे संपूर्ण देश खूप दु:खी आणि चिंतीत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजे, हे काम संपूर्ण जगाला दिसले पाहिजे आणि प्रभावी असले पाहिजे,’’

अशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतात. मात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल. तसेच हे काम ही सरकारची जबाबदारीच आहे, असा मायावती यांनी सांगितले.  

एकीकडे गलवानवरून कांग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत असताना मायावती यांनी अशा आशयाचे विधान केल्याने हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, आज सकाळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस पक्ष सरकारविरोधात आक्रमक झाला आहे.  दरम्यान, मनमोहन सिंग यांनी केलेल्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनमोहनसिंग यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात की, निश्चितच ते काही विषयांसंदर्भात आम्हाला सल्ला व सूचना देऊ शकतात. मात्र, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी त्यापैकी एक नाही. शिवाय ते त्याच पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाने हजारो किमी जमीन चीनला देऊ केल्याचे म्हटले. नड्डा यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. डॉक्टर मनमोहनसिग हे त्याच पक्षाचे आहेत, ज्या पक्षाने 43000 किमी जमी चीनला दिली आहे. कुठल्याही लढाईशिवाय रणनिती आणि क्षेत्रीय समर्पण युपीए सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. डॉ. सिंग हे चीनी डिझाईनमुळे चिंतेत आहेत. सन 2010 ते 2013 या कालावधीत चीनकडून 600 पेक्षा अधिकवेळी सीमाभागात घुसखोरी करण्यात आली, त्यावेळी सिंग हेच अध्यक्ष होते, असेही नड्डा यांनी म्हटलंय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपाladakhलडाखIndiaभारत