आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

By Admin | Updated: February 13, 2015 20:42 IST2015-02-13T20:42:32+5:302015-02-13T20:42:32+5:30

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली.

The witness of the Asaram rape case was attacked outside the court | आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. १३ - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली. या हल्यात साक्षीदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
बलात्कार प्रकरणाचा तपास सध्या जोधपूर कोर्टात सुरू आहे. शुक्रवारी सुनावणीनंतर राहुल के सच्चान हा साक्षीदार कोर्टाच्या बाहेर पडताच सत्यनरीन या तरुणाने हातातील चाकूने सच्चान याच्यावर हल्ला चढवला. सच्चान यांच्या पाठीत दोनदा चाकूने वार केल्याने सच्चान जखमी झाला. पोलिसांनी तात्काळ सच्चानला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (कायदा आणि व्यवस्था )कैलाश संधू यांनी दिली. आपल्यावर हल्ला करणारा हा आसाराम यांच्या आश्रमातील मदतनीस असल्याचे राहुल सच्चान यांनी सांगितले. हल्ला करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे संधू यांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन आसाराम यांना सप्टेंबर २०१३ साली अटक करण्यात आली असून त्यानंतर जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: The witness of the Asaram rape case was attacked outside the court