शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

"आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते..."; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:07 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान बुधवारी (दि.११) काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे अनेक नेते आतापर्यंत तुरुंगात गेले असते, असे मल्लिकार्जुन खरगे अनंतनागमधील प्रचारसभेत म्हणाले. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे विधान काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?भाजपचे लोक ४०० पार, ४०० पार म्हणायचे. तुमचा ४०० पार कुठे गेला? त्यांना केवळ २४० जागा मिळाल्या. आम्ही आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर ते तुरुंगात गेले असते. ते तुरुंगात राहण्यास पात्र आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. दरम्याान, 'अबकी बार ४०० पार' ही भाजपची लोकसभा निवडणुकीत घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या होत्या.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, हे काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. तसेच, काँग्रेसला तो वारसा पुढे चालवायचा आहे, असे म्हणत शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, ती २१ महिने होती.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर