पत्नीने जर पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा स्थितीतही पतीला पोटगी द्यावी लागेल का? या प्रश्नाचं उत्तर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने अलीकडेच एका सुनावणीत दिले आहे. या प्रकरणात हायकोर्टाने पतीला दिलासा देत कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. कौटुंबिक न्यायालयाने पतीला दर महिना पत्नीला मेटेंनेस देण्याचे आदेश दिले होते. या पत्नीवर पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
हायकोर्टाने २२ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी घेतली. त्यावेळी म्हटलं की, सध्या २५ ऑगस्ट २०२५ च्या लुधियाना फॅमिली कोर्टाने दिलेल्या आदेशावर आम्ही स्थगिती देत आहोत. या आदेशात पतीला दर महिना ५ हजार रूपये पत्नीला देण्याचे आदेश देण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाला पतीने हायकोर्टात आव्हान दिले होते.
काय आहे प्रकरण?
२०१९ मध्ये लग्नानंतर या जोडपाच्या नात्यात दुरावा आला होता. १३ मे च्या रात्री जेव्हा पती झोपायला जात होता तेव्हा पत्नीने ज्वलनशील पदार्थ त्याच्यावर टाकले, ज्यातून पतीचे शरीर ४५ टक्के भाजले. या घटनेनंतर ४ महिन्याहून अधिक काळ त्याच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणात पत्नीविरोधात गुन्हाही दाखल आहे. त्यात तिला अंतरिम जामीन मिळाला नाही. आरोपी पत्नी एक वर्षाहून अधिक काळ फरार होती. हत्येचा प्रयत्न असणाऱ्या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर पत्नीने जाणुनबुजून मेटेनेंस याचिका दाखल केली असा पतीच्या वकिलाने युक्तिवाद मांडला. हे सर्व पाहता हायकोर्टाने तात्पुरता मेटेनेंस आदेशावर स्थगिती दिली. या पुढची सुनावणी २५ मे रोजी होणार आहे.
Web Summary : Punjab & Haryana HC stayed family court's order for husband to pay alimony. Wife is accused of attempting to burn him alive. The court questioned the timing of the maintenance petition, given the ongoing attempted murder trial. Next hearing is on May 25th.
Web Summary : पंजाब और हरियाणा उच्च न्यायालय ने पति को गुजारा भत्ता देने के पारिवारिक अदालत के आदेश पर रोक लगा दी। पत्नी पर उसे जिंदा जलाने का आरोप है। अदालत ने हत्या के प्रयास के मुकदमे को देखते हुए रखरखाव याचिका के समय पर सवाल उठाया। अगली सुनवाई 25 मई को है।