नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. देशातील दोन्ही प्रमुख पक्ष असलेले भाजप व काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.२०१४ पर्यंत या दोन्ही राज्यांची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. मात्र यानंतर आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून राज्ये निसटत गेली. मागील पाच वर्षांपासून दोन्ही राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. आता परत एकदा महाराष्ट्र व हरयाणामध्ये भाजपला धक्का देत काँग्रेस सत्तेवर येणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मधील काही वर्षे काँग्रेससाठी चांगली राहिली. यात पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब व राजस्थानमध्ये भाजपला मात दिली व स्वबळावर सत्ता स्थापन केली. २०१८ पर्यंत काँग्रेसचे सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले. तर अनेक राज्ये अशी आहेत, जेथे काँग्रेस अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूरच आहे.
महाराष्ट्र, हरयाणात पुन्हा दिसेल का काँग्रेसचा मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:01 IST