पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:43 IST2025-05-31T17:42:17+5:302025-05-31T17:43:32+5:30

गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे...

Will Corona strike again 685 new patients, 4 deaths in 24 hours across the country; number of active patients at 3395 | पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

देशात कोरोना व्हायरस पुन्हा एकादा हात-पाय पसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने 31 मेच्या सकाळी 8 बजेपर्यंतच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसर देशातील कोरोना पॉझिटिव्ह अथवा सक्रिय रुग्णांचा आकडा वाढून 3395 वर पहोचला आहे. गेल्या 24 तासांत 685 नवे संक्रमित रुग्ण समोर आले आहेत. तर 1,435 रुग्णांना ठणठणीत झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यातच चिंतेची गोष्ट म्हणजे, गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यात छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

24 तासांत कुठे किती नवे रुग्ण आढळले? -
केरळ- 189, कर्नाटक- 86, पश्चिम बंगाल- 89, दिल्ली- 81, उत्तर प्रदेश- 75, तामिळनाडू- 37, महाराष्ट्र- 43, गुजरात- 42, राजस्थान- 9, पुद्दुचेरी – 6, मध्य प्रदेश- 6, हरियाणा- 6, झारखंड- 6, ओडिशा- 2, जम्मू-कश्मीर- 2, छत्तीसगड- 3, आंध्र प्रदेश- 1, पंजाब- 1 आणि गोवा- 1

कोणत्या राज्यात किती सक्रीय रुग्ण? -
केरळ- 1,336, महाराष्ट्र- 467, दिल्ली- 375, कर्नाटक- 234, पश्चिम बंगाल- 205, तामिळनाडू- 185, उत्तर प्रदेश- 117, गुजरात-265, पुद्दुचेरी- 41, राजस्थान- 60, हरियाणा- 26, मध्य प्रदेश- 16, झारखंड- 6 आणि पंजाब- 5.

राज्यांना अलर्ट राहण्याचे आणि टेस्टिंग वाढवण्याचे निर्देश - 
आरोग्य मंत्रालयाकडून सर्वच राज्यांना सातत्याने अलर्ट राहण्याचे आणि टेस्टिंग वाढवण्याचे निर्देश दिले जात आहेत. याशिवाय, नागरिकांनाही सामान्य लक्षणे दिसताच ताबडतोब तपाणी करण्याचे आणि आवश्यक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

खबरदारी बाळगण्याचा सल्ला -
शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ताप किंवा खोकल्यासारखी लक्षणे दिसली तर त्यांनाही कोविड योग्य वर्तन (CAB) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारकडूनशाळांसाठी सूचना... -

१. नियमित हात धुण्याची सवय

२. खोकलतांना अथवा शिंकताना शिष्टाचार पाळणे

३. गर्दी टाळणे आणि मास्क वापरणे (आवश्यक असल्यास)
 

Web Title: Will Corona strike again 685 new patients, 4 deaths in 24 hours across the country; number of active patients at 3395

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.