शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मृताच्या संग्रहित वीर्यावर पत्नीचाच हक्क, वडिलांना ताबा देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:48 IST

पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे.

काेलकाता : मृत्यू झालेल्या विवाहित मुलाने संग्रहित करून ठेवलेल्या वीर्यावर केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार असल्याचा निर्णय देताना पित्याला त्याचा ताबा देण्याची मागणी काेलकाता उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. मृतक मुलगा हा थायलेसेमिया आजाराने ग्रस्त हाेता. भविष्यातील उपयाेगासाठी त्याने दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये वीर्य संरक्षित करून ठेवले. या संस्थेकडे त्यांनी दान करणाऱ्या व्यक्तीचा पिता या नात्याने वीर्याचा ताबा देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालयाने त्यांना मृत व्यक्तीच्या पत्नीची परवानगी आवश्यक असून, विवाह झाल्याचा पुरावादेखील सादर करावा लागेल, असे सांगितले. याचिकाकर्त्याने सुनेला परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, तिने परवानगी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.न्यायालयाचे निरीक्षण -वडील आहात म्हणून मुलाच्या संततीचा ताबा मिळण्याचा अधिकार मिळत नाही. मुलगा विवाहित असून, पत्नीसाेबत राहत हाेता. त्यामुळे केवळ तिचाच अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल