शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा 'पद्मावत' चित्रपट पाहण्याचा हट्ट, नव-याने पोलिसांकडे मागितलं संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:44 IST

करणी सेनेने थिएटर फोडण्याची धमकी दिली असल्याने पत्नीच्या या मागणीमुळे पतीला घाम फुटला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

गाझियाबाद - अनेक वाद-विवाद, चर्चेनंतर अखेर पद्मावत चित्रपट रिलीज होत आहे. वादाच्या भोव-यात अडकलेल्या 'पद्मावत' चित्रपटात नेमकं असं काय आहे ज्यामुळे एवढा मोठा वाद झाला हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनेक ठिकाणी थिएटर हाऊसफुल्ल झाली असून, ऑनलाइन बुकिंगला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका पत्नीने आपल्या पतीकडे 'पद्मावत' चित्रपट पाहण्याचा हट्ट केलाय. पण करणी सेनेने थिएटर फोडण्याची धमकी दिली असल्याने पत्नीच्या या मागणीमुळे पतीला घाम फुटला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना ट्विट करत पतीने सुरक्षेची हमी मागितली आणि विशेष म्हणजे पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिलं आहे. 

ही गाझियाबादमधील घटना आहे. गाझियाबादमधील संदीप सिंह यांनी सोमवारी गाझियाबाद पोलिसांना एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, 'माझी पत्नी पद्मावत चित्रपट पाहण्याचा हट्ट करत आहे. चित्रपट पाहायला गेल्यास माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी गाझियाबाद पोलीस देऊ शकते का ?'. 

गाझियाबाद पोलिसांनी संदीप सिंह यांच्या ट्विटला उत्तरही दिलं. 'तुम्ही निश्चिंत होऊन सिनेमा पाहायला जा. गाझियाबाद पोलीस तुम्हाला सुरक्षा पुरवेल,' अशी हमी पोलिसांनी दिली. 

उद्या म्हणजेच 25 जानेवारीला पद्मावत चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. करणी सेना अद्यापही चित्रपटाचा विरोध करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहांची तोडफोड करण्यात येईल अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. 

टॅग्स :Padmavatपद्मावतDeepika Padukoneदीपिका पादुकोणSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी