स्वैराचार अंगलट! इन्स्टा चॅटवरुन जिला भेटायला बोलावलं 'ती' निघाली बायको, नवऱ्याची फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:16 IST2025-05-17T12:16:43+5:302025-05-17T12:16:55+5:30

लग्नानंतरही अविवाहित असल्याचं सांगून मुलींना प्रेमात पाडणाऱ्या एका पुरुषाची त्याच्याच पत्नीने पोलखोल  आहे.

wife becomes instagram girlfriend to catch husband cheating and debauchery in gwalior | स्वैराचार अंगलट! इन्स्टा चॅटवरुन जिला भेटायला बोलावलं 'ती' निघाली बायको, नवऱ्याची फजिती

स्वैराचार अंगलट! इन्स्टा चॅटवरुन जिला भेटायला बोलावलं 'ती' निघाली बायको, नवऱ्याची फजिती

लग्नानंतरही अविवाहित असल्याचं सांगून मुलींना प्रेमात पाडणाऱ्या एका पुरुषाची त्याच्याच पत्नीने पोलखोल आहे. सोशल मीडियाद्वारे पत्नीने नवीन अकाऊंट सुरू करून पतीशी मैत्री केली आणि त्याला एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठी बोलावलं आणि रंगेहाथ पकडलं. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील माधोगंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरुणीचं २०२३ मध्ये एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं होतं.

लग्नानंतर पती अनेकदा तासन्तास मोबाईलवर व्यस्त असायचा आणि घराबाहेर जाऊन बोलत असे. या हालचालींमुळे पत्नीला त्याचा संशय आला. विचारपूस केली असता, त्याने कंपनीकडून फोन येतात असं सांगितलं. मोबाईल लॉक करणं, रात्री उशिरापर्यंत इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सएपवर चॅट करणं आणि बहुतेक वेळ घराबाहेर राहणे यामुळे नवविवाहित महिलेला त्रास होऊ लागला.

पत्नीला संशय आल्यावर तिने बनावट नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि एका सुंदर मुलीचा डीपी ठेवला. मग तिने त्याच आयडीवरून तिच्या पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीने ती लगेच एक्सेप्ट केली आणि तासन्तास गप्पा मारू लागला. पतीला रंगेहाथ पकडण्यासाठी तिने त्याला एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. पती भेटायला आला. पण जेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्राम गर्लफ्रेंडऐवजी त्याच्या पत्नीला पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला.

पकड्यानंतरही पती आपल्या पत्नीला खोटं सांगत होता की, तो एका क्लायंटला भेटायला आला आहे. पण जेव्हा पत्नीने चॅट हिस्ट्री दाखवली तेव्हा त्याचा खोटेपणा पकडला गेला. पत्नीने सांगितलं की, ज्या मुलीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेमाबद्दल बोलायचा ती दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः होती. रेस्टॉरंटमध्ये दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पत्नीने पतीवर फसवणूकीचा आरोप केला आणि घटस्फोटाची मागणी केली आहे. 

Web Title: wife becomes instagram girlfriend to catch husband cheating and debauchery in gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.