शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

माझी ऑफर नाकारू नका, मी दिलेले पैसे बँकांना घ्यायला सांगा; विजय मल्ल्याचे मोदींसाठी ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:48 PM

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने थकीत रकमेची परतफेड करण्याचा पुर्नउच्चार केला आहे.

ठळक मुद्देबँकांना थकीत रक्कम द्यायला तयार - विजय मल्ल्यापंतप्रधान मोदी, बँकाना पैसे घ्यायला सांगा - विजय मल्ल्या

नवी दिल्ली - बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने थकीत रकमेची परतफेड करण्याचा पुर्नउच्चार केला आहे. सोळाव्या लोकसभेत संसदेतील अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मल्ल्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. याचाच संदर्भ देत मल्ल्यानं गुरुवारी (14 फेब्रुवारी) ट्विट केले आहे. मल्ल्यानं ट्विट करत म्हटलंय की, बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण मी ऐकले. निश्चित ते एक अतिशय उत्तम वक्ते आहेत. भाषणादरम्यान त्यांनी 9000 कोटी रुपये घेऊन पळालेल्या एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख केला. त्यांचा हा रोख माझ्यावर होता, याचा अंदाज मी लावू शकतो.

मी त्यांना आदरपूर्वक विचारू इच्छितो की, यापूर्वीही मी थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शवलेली असताना संबंधित रक्कम स्वीकारण्याचे बँकांना का निर्देश देत नाहीत?, असा प्रश्न मल्ल्यानं पंतप्रधान मोदींना विचारला आहे.  शिवाय, किंगफिशरला दिलेल्या कर्जाची वसुली केल्याचे श्रेय ते घेऊ शकतात असेही मल्ल्याने टि्वटमध्ये म्हटलंय.

पुढे त्यानं असंही सांगितले की, कर्जफेडीसंदर्भात मी कर्नाटक उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दुर्लक्ष करुन हा अर्ज फेटाळला जाऊ शकत नाही. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले पैसे बँकांनी का घेतले नाहीत? असा प्रश्नही मल्ल्याने उपस्थित केला आहे.  मी संपत्ती लपवून ठेवल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने केलेला हा दावा त्रासदायक आहे. जर संपत्ती लपवून ठेवली असती तर, जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबतची माहिती मी सार्वजनिकरित्या कोर्टासमोर कशी मांडली?, असंही मल्ल्यानं ट्विट केले आहे. दरम्यान,  भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण करारावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, मल्ल्याने भारतात येण्यास नकार दिला आहे. शिवाय, आपण कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची प्रकिया सुरू केल्याचेही त्याने सांगितले.  

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँक