शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

इतना भरोसा, इतना भरोसा...! PM मोदी गेहलोतांवर एवढे खूश का? दोन्ही हातात 'लड्डू' म्हणत खेळी मोठी चाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:26 IST

पंतप्रधा मोदी यांच्या या वक्तव्याकडे मोठी राजकीय खेळी म्हणणूनही पाहिले जात आहे...

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानातीलकाँग्रेसवरील राजकीय संकटावरून मुंख्यमंत्री गेहलोत यांना कोपरखळी मारली. 'मी गहलोत यांचे विशेष आभार मानतो. ते सध्या अनेक राजकीय संकटांचा सामना करत आहेत. मात्र असे असले तरी, त्यांनी विकास कामासाठी वेळ काढला आणि रेल्वेच्या या कार्यक्रमात सहभागी झाले. मी त्यांचे स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पंतप्रधा मोदी यांच्या या वक्तव्याकडे मोठी राजकीय खेळी म्हणणूनही पाहिले जात आहे.

गेहलोत सरकार आणि काँग्रेस पायलट प्रकरण पक्षांतर्गत असल्याचे म्हणत त्याकडे दूर्लक्ष करत आहे. मात्र, याच वेळी पीएम मोदी यांनी हे राजस्थान काँग्रेसमधील 'संकट' असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजस्थानातील राजकीय अस्थिरता आणखी वाढू शकते. राजकीय विश्लेषक मोदी यांच्या या वक्तव्याकडे भाजपची जनते समोरील कांग्रेसविरोधातील मोठी चाल म्हणून पाहत आहेत. यामुळेच सीएम गेहलोत यांच्या ओएसडीने पीएम मोदी यांच्या या वक्तव्यावर आणि रेल्वे मंत्र्यांच्या 'सबका विश्वास!' या ट्विटवर काही वेळातच पलटवार केला आहे.

आपला विश्वास हीच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद - मोदी म्हणाले, 'मी गेहलोत यांना सांगू इच्छितो की, आपल्या दोन्ही हातात 'लड्डू' आहेत. आपले रेल्वे मंत्रीही राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचेच आहेत. दुसरे म्हणजे, जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच व्हायला हवे होते ते आजपर्यंत झाले नाही. पण आपला माझ्यावर एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे की, आपण ती कामेही माझ्यासमोर ठेवली आहेत. आपला हा विश्वासच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद आहे आणि आपण एक मित्र म्हणून जो विश्वास दाखवता, यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे.'

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस