राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:00 IST2026-01-10T19:58:43+5:302026-01-10T20:00:02+5:30
Ram Mandir Ayodhya: कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये आज एका व्यक्तीने नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच आता या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून, त्याच्या चौकशीमधून खळबळजनक माहिती समोर येत आहे.

राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...
कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये आज एका व्यक्तीने नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच आता या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून, त्याच्या चौकशीमधून खळबळजनक माहिती समोर येत आहे.
राम मंदिर परिसरात नमाज पढताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अब्दुल अहद शेख असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो जम्मू काश्मीरमधील शोपियाँ येथील रहिवासी आहे. त्याचं वय ५५ वर्षे असून, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यान सीता की रसोईजवळ नमाज पढण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासामधून समोर आलं आहे.
सुरक्षा दलांनी त्याच्याकडील सामानाच्या घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडे काजू आणि मनुका सापडल्या आहेत. चौकशीमध्ये सदर व्यक्तीने अजमेर येथे जाण्याबाबतही माहिती दिली आहे. आता तो अयोध्येला का आला होता, कुणाच्या सांगण्यावरून तो इथे आला, तसेच मंदिर परिसरात का गेला आणि तिथे नमाज पठण करण्यामागे त्याचा हेतू काय होता? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.
तसेच अयोध्या पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणी काश्मीरमध्येही तपासाला सुरुवात केली आहे. तसेच शोपियाँ येथील त्याच्या घरी जाऊन सुरक्षा दलांनी माहिती घेतली आहे. तिथे सदर व्यक्तीचा मुलगा इम्रान शेख याने त्याचे वडील पाच-सहा दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले होते. तसेच ते अयोध्येला का गेले? याची माहिती आपल्याना नसल्याचे सांगितले. तसेच अब्दुल अहद शेख याची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.