शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Live: गुजरातमध्ये अटीतटीची लढत,हिमाचलमध्ये भाजपाला आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 09:13 IST

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. 

ठळक मुद्देमतमोजणी थोड्याचवेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज.182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान, 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान, गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी,हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होणार. गुजरातच्या सत्तेचा ताज कोणाला मिळणार व एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार.

अहमदाबाद / शिमला :  देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि गुजरातमुळे काहीशा झाकोळलेल्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपाला टक्कर दिली आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान,  दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

 

 

182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले आहे. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप  हार्दिक पटेलने केला आहे.  ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.  अहमदाबादस्थित एका कंपनीचे 150 अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट आहे. देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, असा आरोप हार्दिक पटेल याने केला आहे. दुसरीकडे भाजपाचेच पुण्यातील सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिल, असं संजय काकडे म्हणाले आहेत.  

मात्र,मुंबईत नरिमन पॉईंट भागात जल्लोषाची तयारी भाजपाने केल्याचे दिसून येत आहे. भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आले आहे. ज्यावर जल्लोष असे लिहिण्यात आले असून ‘गुजरात-हिमाचल भाजपा की जीत’ असा मजकूरही छापण्यात आला आहे. बॅनरच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत. 

या सर्व घडामोडींमुळे गुजरातच्या सत्तेचा ताज कोणाला मिळणार व एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसhardik patelहार्दिक पटेलAlpesh Thakorअल्पेश ठाकुरElectionनिवडणूकAmit Shahअमित शाह