शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी काय संबंध? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:24 PM

Disha Ravi Arrest: दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमकडून 'टूलकिट' प्रकरणी दिशाला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली: गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या दिशा रवीला (Disha Ravi Arrest) अटक केली. दिशा हवामान बदलांसंदर्भात काम करते. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं दिशाला रविवारी बंगळुरूतून अटक केली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गसोबत दिशा रवीनं शेअर टूलकिट डॉक्युमेंट शेअर केलं होतं, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. २६ जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान हिंसाचार झाला. त्या कटात दिशाचा सहभाग होता. ती या कटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोपदेखील पोलिसांनी केला आहे. 'दिशानं यासाठी एक व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून तिनं टूलकिट तयार केलं,' अशी माहिती पोलिसांनी ट्विट करून दिली. या ग्रुपमधील सगळे जण खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या पोएटिक जस्टिस संस्थेच्या संपर्कात होते, असा दावादेखील पोलिसांनी केला आहे."एका निशस्त्र तरुणीला बंदूकवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्यादिशा रवी आहे तरी कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी संबंध काय?दिशा रवी २२ वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं २०१८ मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं २०१९ मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते."जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय"हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.दिशाला कोणामुळे मिळाली प्रेरणा?हवामान बदल, पर्यावरण याबद्दल काम करण्याची प्रेरणा दिशाला आजी आजोबांकडून मिळाली. दिशाचे आजी आजोबा शेतकरी आहेत. हवामानातील बदलांचा फटका त्यांच्या शेतीला बसतो. त्यामुळेच या विषयावर काम करण्याचा निर्णय दिशानं घेतला.दिशावर कोणकोणते गुन्हे दाखल?दिशाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वेष भावना निर्माण करण्यासाठी कारस्थान रचल्याचा गुन्हादेखील तिच्याविरोधात नोंदवला गेला आहे. दिशाला रविवारी (काल) अटक करण्याक आली. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली.

टॅग्स :Disha Raviदिशा रविFarmers Protestशेतकरी आंदोलनGreta Thunbergग्रेटा थनबर्गToolkit Controversyटूलकिट वाद