"जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय" 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:36 AM2021-02-15T10:36:14+5:302021-02-15T11:53:03+5:30

P. Chidambaram And Disha Ravi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा विरोध केला आहे.

p chidambaram came in support of disha ravi said india is standing on very weak foundation | "जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय" 

"जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय" 

Next

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट प्रकरणी मोठी कारवाई करत बंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. चार फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध केला आहे. यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "भारत मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. 

पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला असल्याची घणाघाती टीका देखील चिदंबरम यांनी केली आहे. "जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

"भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे"

"भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलीस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिेले आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात दिशा वास्तव्याला असून, याच भागातून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासह इंटरनेट सेवा बंद केली होती. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी गुगल आणि अन्य बड्या सोशल मीडिया कंपन्यांना टूलकिट प्रकरणात उल्लेख करण्यात आलेल्या ई-मेल आणि यूआरएलसंदर्भात माहिती मागवत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ग्रेटाने टूलकिटचा उल्लेख करत मदत करायची असेल, तर या टूलकिटचा वापर करावा, असे आवाहन केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात या टूलकिटचा संबंध खलिस्तानी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: p chidambaram came in support of disha ravi said india is standing on very weak foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.