शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज--४ मे-सद्गुरू

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

प्रदीपची पार्टी

प्रदीपची पार्टी
प्रदीप घाडी आमोणकर हे नाव कुणाला ठाऊक नाही असे नाही. मध्यंतरी त्यांनी मराठी राज्यभाषा व्हायला हवी म्हणून चळवळ चालवली. त्यांचे सहकारी ॲड. अजितसिंग राणे हे गेल्याच महिन्यात शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले व राज्यप्रमुख बनले. प्रदीप आमोणकर आता आम आदमी पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत. गोव्यात आम आदमी पक्षाच्या कामास अजून जोर चढलेला नाही. रेमो फर्नांडिसने लहर आली तेव्हा आम आदमी पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. ऑस्कर रिबेलो यांनी फावल्या वेळेत आम आदमी पक्षाचे काम करण्याचा प्रयत्न केला. राजन काकोडकर, वाघेला, वाल्मिकी नायक वगैरे मंडळींनी आम आदमी पक्षाचे आतापर्यंत गंभीरपणे काम केले आहे. पक्ष छोटा असला तरी, त्यात गट कमी नाहीत हे पणजीच्या पोटनिवडणुकीवेळीही दिसून आले. आता प्रदीपजी या पक्षातील कोणत्या गटात असतील ते कळत नाही.

इजिदोर नसले तरी...
काणकोण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यापुढे विधानसभा निवडणुकीवेळी कोण असतील ते स्पष्ट नाही. मात्र, माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांना आपणच उमेदवार असेन असे अगोदर वाटत होते. लुईिझन फालेरो हे प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून मात्र काणकोणमध्ये आणखीही उमेदवार तयार झाले. काणकोणमध्ये रविवारी जी सभा झाली, त्या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. इजिदोर फर्नांडिस त्या सभेला गेले नाहीतच. गट काँग्रेस अध्यक्षही गेले नाहीत. सभेपासून इजिदोरची सगळीच माणसे दूर राहिली. तरीही सभेला गर्दी झाली. म्हणजे काँग्रेससाठी नवे उमेदवार व नवे समर्थकही तयार झाले आहेत. प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव महादेव देसाई व इतरांनी मिळून सभा यशस्वी केली. आपल्याला अगोदर उमेदवार जाहीर करा, मग सभेचे आयोजन करतो, अशी अट म्हणे इजिदोरने घातली होती.