...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 13:39 IST2018-12-04T13:38:47+5:302018-12-04T13:39:33+5:30
सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा
हनुमानगड ( राजस्थान) - सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजुतदारपणा, संवेदनशिलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानमध्ये गेले नसते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
राजस्थानमधील हनुमानगड येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी करतारपूर गुरुद्वावारवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना प्रथमच उत्तर दिले. यावेळी करतारपूर पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी काँग्रेसच कारणीभूत असल्याचा आरोप मोदींनी केला. ''फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांना भारताच्या इतिहासात गुरुनानक देव यांचे स्थान काय होते याबाबत थोडीफार समजूत, संवेदनशीलता आणि गांभीर्य असते तर सरहद्दीपासून तीन किमी अंतरावर असलेले करतारपूर भारतापासून वेगळे झाले नसते.'' असा आरोप मोदींनी केला.
PM Modi in Rajasthan's Hanumangarh: Kyun Congress ko 1947 mein yaad nahi aaya ki #Kartarpur Hindustan mein hona chahiye? Kyun 70 saal mein nahi kiya? Aaj agar corridor ban raha hai to iska credit Modi ko nahi aapke ek vote ko jaata hai ( pic source: BJP) pic.twitter.com/sfUhw2JTNx
— ANI (@ANI) December 4, 2018
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे करतारपूर कॉरिडोरवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतल्याने भाजपाकडून सिद्धूवर टीका होत आहे. तर सिद्धू यांनी थेट मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.