तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 23:06 IST2025-10-06T23:06:16+5:302025-10-06T23:06:31+5:30
Instagram Special Feature: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या साईटपैकीइन्स्टाग्रामच्या मॅपवर एक खास फिचर आलं आहे. स्नॅपचॅटवर हे फिचर आधीपासून होतं. आता ते इन्स्टाग्रामवरही आलं असून, स्नॅपचॅटमधील बहुतांश फिचर्स इन्स्टाग्रामनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरून दिले आहेत.

तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या साईटपैकीइन्स्टाग्रामच्या मॅपवर एक खास फिचर आलं आहे. स्नॅपचॅटवर हे फिचर आधीपासून होतं. आता ते इन्स्टाग्रामवरही आलं असून, स्नॅपचॅटमधील बहुतांश फिचर्स इन्स्टाग्रामनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरून दिले आहेत.
इन्स्टाग्रामच्या नव्या मॅपवर अनेक छोटेछोटे फिचर्स आहेत. मात्र अनेक जण या फिचर्समुळे प्रायव्हसीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या फिचर्समुळे इन्स्टाग्रामवरही लोकांची लोकेशन इतरांना दिसू शकणार आहे. मात्र गैरवापर रोखण्यासाठी इन्स्टाग्रामने काही प्रायव्हसी ऑप्शनसुद्धा दिले आहेत.
इन्स्टाग्रामच्या मॅप फिचरमध्ये कुणासोबत लोकेशन शेअर करायचं, याबाबतचा पर्याय युझर्सना देण्यात आला आहे. तुम्ही हवं असल्यास काही निवडक मित्र किंवा ग्रुपसह आपलं लोकेशन शेअर करू शकता. नेव्हिगेशनसाठी गुगल आणि अॅपल मॅप्स जगभरात प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत इन्स्टाग्रामवर देण्यातआलेला मॅप कसा परिणामकारक ठरतो याबाबत उत्सुकता आहे.
इन्स्टाग्रामच्या नव्या मॅप फिचरच्या माध्यमातून युझर्स लोकेशटन टॅग केलेल्या लोकेशन बेस्ट पोस्ट, रील्स आणि स्टोरीज एक्स्प्लोअर करू शकतील. तसेच येथून कॅफे, ट्रेंडिंग सिटी स्पोर्ट्स आणि मित्रांचा प्रवास पाहू शकता. एवढंच नाही तर लोक येथे कुठे पार्टी सुरू आहे, किंवा कुठला कार्यक्रम आहे, याबाबतची वेळ अपडेट करू शकतील. त्यामधून लोकांना त्यांच्या आसपास सुरू असलेल्या इव्हेंट्स पार्टी आणि गॅदरिंगबाबत माहिती मिळू शकेल.