शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

"राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 8:24 AM

एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जातेआम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाहीभाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींना लगावला टोला

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर झाल्यापासून या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारणास सुरुवात झाली आहे. एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोला भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींना लगावला आहे.ओवेसींनी केलेले ट्विट रिट्विट करत तेजस्वी सूर्या म्हणाले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या अधिकृत निवासस्थानी इफ्तार पार्टींचे आयोजन करायचे तेव्हा तुमची धर्मनिरपेक्षता कुठे होती. मंदिर पाडून मशीद बांधली गेली होती. ती चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावे, असा सवालही औवेसी यांनी उपस्थित केला आहे. आऊटलूक या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत औवेसी यांनी बाबरी मशिद आणि अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनसंदर्भात आपले मत व्यक्त केले होते.अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ ऑगस्ट भूमिपूजन होत आहे. या भूमीपूजनाच्या समारंभाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोजकांनी दिलेले नाही. अर्थात अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आलेले नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपवाद आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPoliticsराजकारण