शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा जया बच्चन यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या सोनिया गांधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 06:23 IST

विरोधी ऐक्याचा हा संदेश केवळ ‘इंडिया’  आघाडीपुरता मर्यादित राहिला नाही तर गांधी आणि बच्चन कुटुंबातील जुन्या संबंधांनाही नवा उजाळा मिळाला.

आदेश रावल -

नवी दिल्ली : संसदेत आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी अतिशय भक्कमपणे उभ्या असल्याचे दिसले. 

विरोधी ऐक्याचा हा संदेश केवळ ‘इंडिया’  आघाडीपुरता मर्यादित राहिला नाही तर गांधी आणि बच्चन कुटुंबातील जुन्या संबंधांनाही नवा उजाळा मिळाला. जया बच्चन पत्रकार परिषदेत  म्हणाल्या की, सभापती आमच्याशी ज्या प्रकारे वागतात ते अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे. आम्ही सर्व सहकारी आहोत. भले ते राज्यसभेच्या सभापतीपदाच्या खुर्चीवर बसले असतील. धनखड यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल माफी मागितली पाहिजे. 

राज्यसभेत नेमके काय झाले?-  सभागृहातील शून्य तास संपण्यापूर्वी आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी एका मुद्यावर धनखड यांनी जया बच्चन यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्यांनी ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला. -  त्यावर त्या म्हणाल्या, मला, ‘जया अमिताभ बच्चन’ असे संबोधू नका. मी एक कलाकार आहे, मला देहबोली समजते, मला भाव समजतात. सर, मला माफ करा; पण तुमचा टोन मला मान्य नाही. तुम्ही सभापतीपदी बसले असला तरी आपण सर्व सहकारी आहोत.  -  सभापती त्यावर म्हणाले, ‘जयाजी, तुम्ही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेता दिग्दर्शकाप्रमाणे काम करतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही सेलिब्रिटी असलात, तरीही तुम्हाला नियम समजून घेणे आवश्यक आहे.’ 

विरोधकांच्या सभात्यागानंतर धनखड म्हणाले, ज्या पद्धतीने विरोधकांनी माझ्याविरोधात मीडियात वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे मी दुखावलो आहे. असे करून विरोधी पक्षांचे नेते लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.   

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRajya Sabhaराज्यसभा