शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'तो' खासदार कसं काम करतोय?; पंतप्रधान मोदींच्या प्रश्नानं भाजप नेते आश्चर्यचकीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 9:11 AM

तो काशीचा खासदार कसं काम करतोय?; भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदींचा उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यशांना सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मोदींनी राज्यातील स्थिती आणि खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या कामाची माहिती या बैठकीत मोदींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी मोदींच्या एका प्रश्नामुळे सगळ्यांनाच काहीसा धक्का बसला. पण त्यानंतर साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आलं....म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीकाभाजपच्या बैठकीला उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधत असताना मोदींनी काशीचा खासदार कसं काम करतोय, असा प्रश्न विचारला. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदींनी काशीच्या खासदाराच्या कामगिरीबद्दल विचारणा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 'मोदींनी भाजप प्रदेशाध्यक्षांनी अचानक विचारलेल्या प्रश्नानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं,' अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिली.मोदी सरकार 100 मालमत्तांची विक्री करण्याच्या तयारीत, ऑगस्टपर्यंत एअर इंडिया-BPCL चा लिलाव होणार?पंतप्रधान मोदी काशीचे (वाराणसी) खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे मोदी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांकडे स्वत:च्या कामगिरीबद्दल विचारणा करत होते. ही बाब लक्षात येताच प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोदींनी २०१४ मध्येही वाराणसीतून निवडणूक लढवली होती. तेव्हाही ते विजयी झाले होते. याशिवाय त्यांनी वडोदऱ्यातूनही निवडणूक लढवली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा