शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:13 IST

सदर अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एएआयबीला सर्व सहकार्य केले

नवी दिल्ली : एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१च्या दुर्घटनेबाबत विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरोने (एएआयबी) आपला प्राथमिक अहवाल मंगळवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला. मात्र हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, त्याबद्दल या अहवालात काय म्हटले आहे, याबद्दलचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे एआय-१७१ हे बोईंग ड्रीमलाइनर विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृहात असलेल्यांपैकी काहीजणदेखील मृत्युमुखी पडले. सदर अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एएआयबीला सर्व सहकार्य केले. 

गोल्डन चॅसिसकडून माहितीच्या अचूकतेची तपासणीअहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मोड्युलमधील माहिती डाउनलोड करण्यात यश आले आहे.  त्या माहितीची अचूकता तपासण्यासाठी त्याच प्रकारचा दुसरा ब्लॅक बॉक्स, ज्याला ‘गोल्डन चॅसिस’ म्हटले जाते, त्याचा वापर करण्यात आला.  या तपास पथकात भारतीय हवाई दल, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अमेरिकेतील नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांचे तज्ज्ञ सहभागी आहेत. याशिवाय, बोईंग, जीई, हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनीही या तपासात सहकार्य केले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया