शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी हिंसाचाराची चौकशी NIA द्वारे व्हावी, भाजपा नेत्याचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:58 IST

West Bengal Ram Navami clashes : मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे.

West Bengal Ram Navami clashes:  पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बुधवारी रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली. या घटनेवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीची चौकशी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे' (NIA) द्वारे करण्यात यावी, असे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावरून सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील टीएमसी सरकारलाही धारेवर धरले आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी पत्रात लिहिले आहे की, "मला तुम्हाला (राज्यपालांना) पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव करून द्यायची आहे. बंगालमध्ये सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर हल्ले करून जातीय तेढ निर्माण करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. राज्यात धार्मिक सण साजरे करणाऱ्या हिंदूंवर दगडफेक आणि बॉम्ब फेकणे ही एक सामान्य घटना बनत चालली आहे. २०२३ मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना पाहायला मिळाली. यावर्षी देखील मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे."

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, "मुर्शिदाबादमध्ये एका विशिष्ट समुदायाने हल्ला केला होता. कारवाई करण्याऐवजी तेथे उपस्थित पोलिसांनी मिरवणुकीवरच अश्रुधुराचे नळकांडे डागले, जेणेकरून आरोपींना वाचवता येईल. माझी तुम्हाला (राज्यपाल) विनंती आहे की, तुम्ही प्रभावित भागांना भेट द्या आणि तेथील तणाव समजून घ्या, या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी, कारण दगडफेकीसोबतच मिरवणुकीवर बॉम्बही फेकण्यात आले आहेत."

परिसरात कलम १४४ लागू दरम्यान, मुर्शिदाबादच्या शक्तीपूर भागात रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, ज्यात २० जण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत. मिरवणुकीदरम्यान स्फोट झाला, त्यात एक महिला जखमी झाली. हा बॉम्बस्फोट होता की अन्य काही कारणामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRam Navamiराम नवमी