शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उमेदवारांनी चक्क व्हॉट्स अॅपवरून भरले पंचायत निवडणुकीच्या उमेदवारीचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 2:54 PM

गेल्या काही काळात माहितीच्या देवाण घेवाणीसाठी व्हॉट्स अॅपचा वापर सर्रासपणे होऊ लागला आहे. मात्र आता व्हॉट्स अॅपचा अजून एक वापर समोर आला आहे.

कोलकाता - गेल्या काही काळात माहितीच्या देवाण घेवाणीसाठी व्हॉट्स अॅपचा वापर सर्रासपणे होऊ लागला आहे. अगदी किरकोळ शुभेच्छा संदेशांपासून बातम्या, व्हिडिओ आणि अन्य महत्त्वाची माहितीही व्हॉट्स अॅपवरून पाठवली जाऊ लागली आहे. मात्र आता व्हॉट्स अॅपचा अजून एक वापर समोर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज चक्क व्हॉट्स अॅपवरून भरल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कलकत्ता हायकोर्टाने व्हॉट्सअॅपवर नामांकन अर्ज भरलेल्या नऊ अपक्ष उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरावेत अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. या नऊ उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघात निवडणूक लढवण्यास मान्यता देण्यात यावी असे न्यायालयाने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.   या तक्रादारांनी आपल्याला स्वतः भांगर-2 च्या गट विकास अधिकाऱ्यांकडे जाऊन नामांकन अर्जाची कागदपत्रे भरणे शक्य झाले नाही त्यामुळे आपण ही कागदपत्रे व्हॉटसअॅपद्वारे पाठविली असे न्यायालयाकडे केलेल्या विनंती न्यायालयाकडे केलेल्या अर्जात केली होती.  या नऊ जणांचे अर्ज भरुन घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने मदत करावी आणि त्यांचे अर्ज अलिपूर उपविभाग अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावेत असे आदेश कलकत्ता हायकोर्टाने दिले होते. मात्र तक्रादारांपैकी शर्मिष्ठा चौधरी यांनी आम्हाला कार्यालयांमध्ये थांबवून ठेवले आणि नंतर आमची कागदपत्रे हिसकावून अर्ज भरण्यापासून आम्हाला रोखले गेले त्यामुळे आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना व्हॉटसअॅपद्वारे अर्ज पाठवले असे न्यायालयाला सांगितले. याबाबत निर्णय देताना न्यायाधीश सुव्रत तालुकदार म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने हे व्हॉटसअॅपवर पाठवलेले अर्ज ग्राह्य धरावेत. आता अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर दोन दिवसांनी म्हणजे 30 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने अशी परवानगी दिली याचा अर्थ तसा पायंडाच पडेल अशी भीती निरर्थक असल्याचे मत घटना अभ्यासक आणि ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी सांगितले. काही लोकांना त्यांच्या लोकशाही अधिकारांपासून वंचित ठेवले जाण्याच्या  अत्यंत विशेष परिस्थितीमध्ये हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याचा पायंडा पडणार नाही. ''हा एक अतिविशिष्ट परिस्थितीत योजलेला अतिविशिष्ट उपाय आहे'' असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि प. बंगालचे महाधिवक्ता जयंत मित्रा यांनी सांगितले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपElectionनिवडणूकIndiaभारतCourtन्यायालय