शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी

By देवेश फडके | Published: February 28, 2021 5:30 PM

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

ठळक मुद्देअभिषेक बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोलसीबीआय आणि ईडी काही लावा मी घाबरत नाही - अभिषेक बॅनर्जीममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणमूल काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर दिली जाईल, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काही झाले तरी भाजपच्या दबावासमोर झुकणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 tmc leader abhishek banerjee slams bjp)

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गळा कापला, तरी जय हिंद, जय बांगला, जय मेदिनीपूर, ममता बॅनर्जी जिंदाबाद आणि तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत राहणार. मला घाबरवण्याचा सुरू असलेला प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

मेदिनीपूर हा शुभेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. शुभेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सर्वांत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ता मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यानंतर गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

मी कोणालाही घाबरत नाही

सीबीआय आणि ईडी यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर करत मला भीती घालू शकत नाही. शुभेंदू अधिकारी यांना घाबरवले गेले असले, तरी मी कोणालाही घाबरत नाही. भाजप करत असलेला अन्याय आणि पसरवत असलेल्या द्वेषाविरोधात मी नेहमीच बोलत राहणार. काही लोकांनी तपास यंत्रणांना घाबरून पक्षबदल केला. मात्र, ही तसे करणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिका