कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 13:01 IST2018-10-16T13:00:09+5:302018-10-16T13:01:18+5:30

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे.

West Bengal : 6 people died, 20 injured when a bus fell into a canal in Hooghly district's Haripal | कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

कोलकाता - पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (16 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.  पोलीस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस कोलकाताच्या दिशेनं प्रवास करत होती.

यावेळेस या बसची पुलावरील कठड्याला धडक बसली आणि बस कालव्यामध्ये कोसळली. दरम्यान, अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत, यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.  
 





 

Web Title: West Bengal : 6 people died, 20 injured when a bus fell into a canal in Hooghly district's Haripal