शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हे तहसील कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 25, 2015 22:42 IST

वर्षभरापासून प्रशासनास मुहूर्त मिळेना : श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांत चढाओढ

वर्षभरापासून प्रशासनास मुहूर्त मिळेना : श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांत चढाओढ
मार्गासनी : वेल्हे येथील तहसील कार्यालयाची इमारत उद्घाटन नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या धुळीचे साम्राज्य त्या ठिकाणी पसरले आहे.
येथील तालुका प्रशासनास गेल्या वर्षभरापासून उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नाही. तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये इमारतीच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी, की वेल्हे तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असे केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तहसील कार्यालयाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली आहेत. इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. मागील वर्षी जुलै २०१४ व डिसेंबर २०१४ तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण कार्यक्रम पत्रिकेमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव नसल्यामुळे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यांनतर सर्वच राजकीय पक्ष तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी सरसावले आहे. आपआपल्या पक्षातील बड्या नेत्यांना कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता असल्याने काँग्रेस पक्षाकडून उद्घाटन झाले पाहिजे असे तालुक्यातील सत्ताधार्‍यांना वाटते. तर तालुक्यातील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यावरून वेल्हे तहसील कार्यालयाचे उद्घाटन कोणत्या पक्षाने करायचे, यावरून चढाओढ लागली आहे.
वेल्हे तहसीलच्या जुन्या इमारतीमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इमारत पूर्णपणे गळत असून, कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल व दस्ताऐवज खराब होत आहेत. उंदरांचा व सापांचा वावर कार्यालयात दिसून येत आहे. कर्मचारी बसण्याच्या ठिकाणी लाकडी तुळ्या तुटल्या आहेत तर कार्यालयाचे छप्पर कर्मचार्‍यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

कोट...
लवकरच तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. - मोसमी बर्डे, प्रांताधिकारी भोर
इमारत पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. इमारत हस्तांतरण केल्याचे पत्र महसूल विभागाकडे देण्यात आले आहे.
- ठाणगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेल्हे

फोटोसाठी ओळ
धूळ खात पडलेली तहसील कार्यालयाची नवी इमारत.