"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:43 IST2025-09-29T10:42:19+5:302025-09-29T10:43:40+5:30

Rahul Gandhi Printu Mahadev News: वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्याने राहुल गांधींना गोळ्या घालू असे विधान केले. या विधानानंतर काँग्रेस थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली. 

"We will shoot Rahul Gandhi in the chest", BJP spokesperson's statement in a TV debate, Congress's letter to Amit Shah | "राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

Rahul Gandhi Latest News: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी नेते आणि सध्याचे भाजप प्रवक्ते प्रिंटु महादेव यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी धमकी दिली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले. यानंतर काँग्रेसने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून तक्रार केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे केरळचे अध्यक्ष आणि सध्या भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली आहे. 

वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे की, महादेव भाजपचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी ही धमकी दिली. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर केंद्र सरकारही यात सहभागी आहे, असे आम्ही समजू, असा गंभीर आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे. 

राहुल गांधींबद्दलचे विधान काय?

काँग्रेसने शाहांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "हिंसाचार भडकावण्याच्या घटनेतील एक महादेवने जाहीरपणे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू. हा ना जीभ घसरण्याचा प्रकार आहे, ना चुकून केले गेले आहे. विचारपूर्वक लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे."

"सत्ताधारी पक्षातील अधिकृत प्रवक्त्याकडून अशा प्रकारे विखारी शब्द वापरले जात आहे, त्यामुळे फक्त राहुल गांधींच्याच जीवाला धोका नाहीये, तर संविधान, कायद्याचे राज्य आणि नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुरक्षेचे उत्तरदायित्वही कमकुवत होतंय", असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. 

"जर तुम्ही या प्रकरणात ठाम आणि सार्वजनिकपणे कारवाई करण्यात अपयशी ठरलात, तर यात सरकारही सामील आहे, असे मानले जाईल. विरोधी पक्षनेत्याविरोधातील हिंसेला वैध करण्याचे आणि परवाना देण्याचे, तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचे गंभीर उल्लंघन आहे", असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. 

Web Title : भाजपा प्रवक्ता ने राहुल गांधी को धमकी दी; कांग्रेस ने अमित शाह को लिखा पत्र।

Web Summary : भाजपा प्रवक्ता प्रिंटू महादेव ने राहुल गांधी को गोली मारने की धमकी दी। कांग्रेस सांसद वेणुगोपाल ने अमित शाह से शिकायत कर कार्रवाई की मांग की। कार्रवाई में विफलता का अर्थ सरकार की संलिप्तता है।

Web Title : BJP Spokesperson Threatens Rahul Gandhi; Congress Writes to Amit Shah.

Web Summary : BJP spokesperson Printu Mahadev threatened to shoot Rahul Gandhi. Congress MP Venugopal complained to Amit Shah, demanding action. Failure to act implies government involvement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.