शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही!

By admin | Updated: September 25, 2015 00:34 IST

संसदेने कसे कामकाज करावे हे आम्ही त्यांना सांगणे म्हणजे राज्यघटनेने आखून दिलेली लक्ष्मणरेखा ओलांडणे ठरेल. त्यामुळे आम्ही ती लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही

नवी दिल्ली : संसदेने कसे कामकाज करावे हे आम्ही त्यांना सांगणे म्हणजे राज्यघटनेने आखून दिलेली लक्ष्मणरेखा ओलांडणे ठरेल. त्यामुळे आम्ही ती लक्ष्मणरेखा ओलांडणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने संसदेला सुरळीत कामकाजासाठी मार्गदर्शिका ठरवून देण्यासाठी केलेली एक जनहित याचिका गुरुवारी फेटाळली.‘फाऊंडेशन फॉर रिस्टोरेशन आॅफ नॅशनल व्हॅल्यूज’ या स्वयंसेवी संस्थेने केलेली जनहित याचिका फेटाळताना सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू व न्या. अतिताव रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले की,संसदेच्या कामावर आम्ही देखरेख करू शकत नाही. सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे हे लोकसभा अध्यक्षांना चांगले ठाऊक आहे. आम्ही लक्ष्मणरेखा लक्षात ठेवायला हवी. आम्हाला ती कधीच ओलांडता येणार नाही. ती लक्ष्मणरेखा ओलांडून आम्ही संसदेला, तुम्ही अशा प्रकारे काम करा किंवा असा प्रकारे करू नका, असे सांगू शकत नाही.याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद सुरु केल्यावर त्याला थांबवत सरन्यायाधीशांनी विचारले, तुम्ही तुमचे घर (न्यायालये) तरी स्वच्छ ठेवले आहे का? कदाचित तुम्हाला माहित नसेल. (पण) किती घरे स्वच्छ आहेत याची,सरन्यायाधीश या नात्याने, मला चांगली माहिती आहे. सरन्यायाधीशांच्या या भाष्याचा संदर्भ मद्रास उच्च न्यायालयात अलीकडेच घडलेल्या घटनेशी होता. तेथे वकिलांनी मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात घोषणा देत कामकाज बंद पाडले होते.पण देशातील सर्वोच्च न्यायालय तरी स्वच्छ आहे, असे सांगून या वकिलाने सरन्यायाधीशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सरन्यायाधीशांनी त्याला पुढे बोलू दिले नाही.सततचा गोंधळ व घोषणाबाजी, सभागृहात होणारी निदर्शने व सदस्यांची अनुपस्थिती यामुळे संसदेचे कामकाज सुरळितपणे चालत नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाऊन अंतिमत: सरकारी तिजोरीवर नाहक बोजा पडतो. त्यामुळे न्यायालयाने संसदेला सुरळीत कामकाज कसे करावे यासाठी मार्गदर्शिका ठरवून द्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)