दहशतवाद्यांना ठोकणारच! नियंत्रण रेषेपलीकडील प्रत्येक तळावर हल्ला करू; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:03 IST2026-05-08T11:03:05+5:302026-05-08T11:03:29+5:30

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीनिमित्त उपलष्करप्रमुख (रणनीती) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी जयपूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्या मोहिमेच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली.

We will definitely hit the terrorists! We will attack every base across the Line of Control; Indian Army warns Pakistan | दहशतवाद्यांना ठोकणारच! नियंत्रण रेषेपलीकडील प्रत्येक तळावर हल्ला करू; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

दहशतवाद्यांना ठोकणारच! नियंत्रण रेषेपलीकडील प्रत्येक तळावर हल्ला करू; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

Marathi News : जयपूर : जयपूर : नियंत्रण रेषेपलीकडील कोणतेही दहशतवादी आश्रयस्थान सुरक्षित नाही आणि भारत आपण ठरवलेल्या कालावधीत व स्वत:च्या पद्धतीने प्रत्येक दहशतवादी तळाविरोधात कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा भारतीय लष्कराने गुरुवारी पाकिस्तानला दिला.

गोव्यात बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक; ६१ टक्के पीडित अल्पवयीन, ‘एनसीआरबी’ची आकडेवारी

  ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीनिमित्त उपलष्करप्रमुख (रणनीती) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी जयपूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्या मोहिमेच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा शेवट नव्हता, तर ती केवळ सुरुवात होती. भारताने आपल्या युद्धतंत्रातील पूर्वीच्या पद्धती बाजूला ठेवल्या. नियंत्रण रेषा आणि पाकिस्तानी हद्दीतले दहशतवादी तळ भारतीय लष्कराने नष्ट केले.  ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाक व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले होते. घई म्हणाले की, पाकिस्तानी हद्दीतले अनेक दहशतवादी तळ सीमा भागातून त्या देशाच्या आणखी अंतर्गत भागात हलवले आहेत. मात्र कितीही अंतर असले तरी भारताच्या अचूक हल्ल्यांच्या टप्प्यातच हे सारे तळ आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी बदलले सोशल मीडिया डीपी

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी आपल्या सोशल मीडिया खात्यांवरील प्रोफाइल फोटो बदलून ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो ठेवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासीयांना ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्र्यांनी डीपी बदलला.

Web Title : भारतीय सेना की पाकिस्तान को चेतावनी: LoC पार आतंकी ठिकाने नष्ट होंगे

Web Summary : भारतीय सेना ने पाकिस्तान को कड़ी चेतावनी दी है कि नियंत्रण रेखा के पार कोई भी आतंकवादी ठिकाना सुरक्षित नहीं है। भारत अपनी मर्जी के समय और तरीके से आतंकवादी शिविरों के खिलाफ कार्रवाई करेगा। 'ऑपरेशन सिंदूर' ने आतंकवादी बुनियादी ढांचे को निशाना बनाया और भारत की बदली हुई युद्ध रणनीति का प्रदर्शन किया।

Web Title : Indian Army Warns Pakistan: Terrorist Camps Across LoC Will Be Hit

Web Summary : The Indian Army issued a stern warning to Pakistan, stating that no terrorist hideout across the Line of Control is safe. India will act against terrorist camps at a time and manner of its choosing. 'Operation Sindoor' targeted terrorist infrastructure and demonstrated India's changed war strategy.