शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 16:00 IST

Citizen Amendment Bill : गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाची अग्निपरीक्षा सुरू आहे. शिवसेना आणि जेडीयूनं या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं भूमिकेत अचानक बदल केला असून, जोपर्यंत विधेयकासंदर्भात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेनेनं भूमिकेत बदल केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला आहे.राज्यसभेत हे विधेयक मांडले असता, शिवसेनेच्या संजय राऊतांनी या विधेयकावर भाष्य केलं आहे. हिंदुत्वावरून शिवसेनेला करण्यात येत असलेल्या लक्ष्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. आमच्या शाळेचे हेडमास्तर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आम्ही त्या सगळ्यांनाच आदर्श मानतो.तसेच संजय राऊतांनी राज्यसभेत या विधेयकासंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही घसखोरांना बाहेर काढणार आहात का?, जर तुम्ही शरणार्थींना स्वीकारत असाल तर त्या मुद्द्यावर कोणतंही राजकारण होता कामा नये. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे का?, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच मी कालपासून ऐकतो आहे की विधेयकाला पाठिंबा देणार राष्ट्रभक्त आणि विरोध करणारे देशविरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्हाला कोणाकडूनही राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट नको, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा