VIDEO : मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाची विद्यार्थ्यांनी केली धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:54 IST2018-05-07T12:51:09+5:302018-05-07T12:54:21+5:30

मुलींना वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका प्राध्यापकाची विद्यार्थ्यांनी चांगलीच धुलाई केली

Watch girl students beating up professor for allegedly sending obscene messages in Patiala | VIDEO : मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाची विद्यार्थ्यांनी केली धुलाई

VIDEO : मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाची विद्यार्थ्यांनी केली धुलाई

पटियाला : मुलींना वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका प्राध्यापकाची विद्यार्थ्यांनी चांगलीच धुलाई केली आहे. हा प्रकार पंजाबच्या पटियालामध्ये घडला आहे. धुलाई केलेला प्राध्यापक पंजाबी भाषा शिकवत होता. काही विद्यार्थिंनींनी प्रोफेसरला असे मॅसेज न पाठवण्याचा इशारा देखील दिला पण तरी तो विद्यार्थिंनींना असे मॅसेज पाठवत होता.  त्यानंतर भररस्त्यात विद्यार्थिनींनी याची धुलाई केली. 

माध्यमांच्या वृत्तनुसार, पटियाला वुमेन कॉलेजमध्ये आरोपी प्रोफेसर पंजाबी विषय शिकवायचा. परिक्षाच्या तयारीसाठी विद्यार्थीनीं या प्राध्यापकाकडून मदत मागितली होती. मदतीच्या बहाण्याने  विद्यार्थिंनींचा मोबाईल क्रमांक त्याने घेतला.  गेल्या काही दिवसांपासून तो विद्यार्थिंनींना अश्लील मॅसेज पाठवत होता. काही विद्यार्थिंनींनी प्राध्यापकाला असे मॅसेज न पाठवण्याची ताकीद दिली होती. त्यानंतरही तो विद्यार्थिंनींना असे मॅसेज पाठवत होता. यानंतर तीन-चार विद्यार्थिंनींनी कॉलेज कँपसमध्ये आरोपी प्राध्यापकाची चांगलीच धुलाई केली. 


हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी प्राध्यापक विद्यार्थिंनींसमोर माफी मागत होता. विद्यार्थिंनींनी आरोपी प्राध्यापकाला खेचून नेहल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये आरोपी प्राध्यापक स्वतःचा बचाव करतांना दिसतोय. विद्यार्थिंनींनी आरोपी प्रोफेसरला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  

 

Web Title: Watch girl students beating up professor for allegedly sending obscene messages in Patiala