शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

वारेमाप संपत्ती करतात, तेच पुन्हा सत्तेत येतात! सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:19 IST

जे आमदार-खासदार अल्पावधील भरघोस संपत्ती करतात, तेच पुन्हा निवडणुकीत जिंकतात, असे गेल्या २५-३० वर्षांच्या अनुभवावरून स्पष्ट दिसते, असे मार्मिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केली.

 नवी दिल्ली : जे आमदार-खासदार अल्पावधील भरघोस संपत्ती करतात, तेच पुन्हा निवडणुकीत जिंकतात, असे गेल्या २५-३० वर्षांच्या अनुभवावरून स्पष्ट दिसते, असे मार्मिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केली.दोन निवडणुकांमधील काळात काही लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत वारेमाप वाढ होणे व हेच लोक पुन्हा निवडून येणे हे अकार्यक्षम तपासामुळे घडते की, या मंडळींना एक प्रकारची कवचकुंडले मिळाल्याचा हा परिणाम आहे, असा सवालही न्यायालयाने केला. आमदार-खासदारांचे उत्पन्न व मालमत्ता यांचा तपशील अधिक पारदर्शीपणे जनतेपुढे सादर व्हावा आणि अल्पावधीत भरघोस संपत्तीवाढ दिसणाºया लोकप्रतिनिधींच्या बेहिशेबी मालमत्तांचा तत्परतेने तपास केला जावा यासाठी ‘लोकप्रहरी’ या स्वयंसेवी संस्थेने याचिका केली आहे. मालमत्तांमध्ये लक्षणीय वाढ झालेल्या आमदार-खासदारांची यादीही याचिकाकर्त्यांनी सादर केली होती.त्या अनुषंगाने प्राप्तिकर विभागाने काय तपास केला याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी केले होते. मंडळाने २६ लोकसभा सदस्य, दोन राज्यसभा सदस्य व व २१६ आमदारांच्या संपतींच्या चौकशीचा तपशील सीलबंद लखोट्यात मंगळवारी सादर केला, तेव्हा न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने वरील भाष्य केले.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांना उद्देशून न्या. चेलमेश्वरम्हणाले की, पाच वर्षांत ज्याच्या संपत्तीत दसपटीने वाढ झाल्याचे दिसते, अशी व्यक्ती आमदार किंवा खासदार या पदावर राहण्याच्या औचित्याचा तुम्ही तपास करायला नको का? ज्याची संपत्ती हजारपटीने वाढल्याची दिसते, त्यांच्याबाबतीत तर लगेच तपास करण्याची यंत्रणा असायला हवी. जेव्हा उत्पन्नाचे स्रोत बनावट दिसतात, तेव्हा चौकशी जरूर केली जाते. यापुढे गुन्हा नोंदविण्याच्या आधीच चौकशी सुरू केली जाऊ शकेल, असे वेणुगोपाळ म्हणाले. पण न्या. चेलमेश्वर यांनी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी राजकारण, गुन्हेगारी व धनशक्ती यांची युती स्पष्ट करणाºया माजी गृहसचिव एन. एन. व्होरा समितीच्या अहवालाचाही दाखला दिला.त्यांना वेगळा न्याय कशासाठी?आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी व लोकसेवक असतात. त्यामुळे त्यांच्या बेहिशेबी मालमत्तांचा तपशील व प्राप्तिकर रीटर्नचा तपशीलही का जाहीर केला जाऊ नये़? असेही न्यायालयाने विचारले. यावर वेणुगोपाळ म्हणाले की, प्रचलित कायद्यानुसार कोणाही करदात्याची माहिती उघड करण्यास मनाई आहे. त्यामुळे फक्त आमदार, खासदारांचा अपवाद केल्यास ते पक्षपात झाल्याची ओरड करतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCorruptionभ्रष्टाचार