नेस वाडियांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात

By Admin | Updated: June 16, 2014 15:29 IST2014-06-16T15:17:48+5:302014-06-16T15:29:43+5:30

अभिनेत्री प्रीती झिंटाने विनयभंगाची तक्रार केल्याने गोत्यात आलेले नेस वाडिया यांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात उतरले आहेत.

Wadia hospital staff in support of Ness Wadia | नेस वाडियांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात

नेस वाडियांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १६-  अभिनेत्री प्रीती झिंटाने विनयभंगाची तक्रार केल्याने गोत्यात आलेले नेस वाडिया यांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी मैदानात उतरले आहेत. वाडियातील काही कर्मचा-यांनी सोमवारी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात धाव घेत प्रीती झिंटा कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. 
आयपीएलदरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये नेस वाडिया यांनी विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्री प्रीती झिंटाने केला होता. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात प्रीती झिंटाने तक्रार दाखल केली असून महिला संघटनाही या घटनेची गंभीर दखल घेतली होती. सोमवारी नेस वाडिया यांच्या समर्थनार्थ वाडिया रुग्णालयातील काही कर्मचारी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात पोहोचले. महिलांची सुरक्षा आमच्यासाठीही महत्त्वाची आहे. पण महिलांच्या सुरक्षेसाठी तयार झालेल्या कायद्यांचा प्रीती झिंटा दुरुपयोग करत आहे असा आरोप या कर्मचा-यांनी केला आहे. यासंदर्भात एक निवेदनही त्यांनी पोलिसांना दिले आहे.  'प्रीती झिंटा व नेस वाडिया यांचे प्रेमसंबंध जगजाहीर होते. ते दोघे आयपीएलमधील किंग्स इलेव्हन संघाचे मालकही आहेत. आता त्यांच्यात काय वाद निर्माण झाला ते माहीत नाही. पण तो वाद दोघांनी सामोपचारानेच मिटवला पाहिजे असे कर्मचा-यांचे नेतृत्व करणा-या उल्हास पांचाळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कर्मचा-यांमध्ये काही महिला कर्मचा-यांचाही समावेश होता. 

Web Title: Wadia hospital staff in support of Ness Wadia