शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

जंगलराजच्या युवराजांपासून मतदारांनी सावध राहावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारमध्ये आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 5:07 AM

Bihar Assembly Election 2020 News : बिहारला आजारी राज्य करण्यास जबाबदार असलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास कोरोनासोबत बिहारला दुहेरी मार सोसावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरभंगा/मुझफ्फरपूर/पाटणा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विरोधी पक्ष  राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) वाभाडे काढत विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांना ‘जंगलराजचे युवराज’ संबोधत  १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या  आश्वासनावरून तेजस्वी यादव यांच्यावर हल्लबोल करीत बिहारच्या मतदारांना जंगलराजच्या युवराजांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.बिहारला आजारी राज्य करण्यास जबाबदार असलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास कोरोनासोबत बिहारला दुहेरी मार सोसावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उत्तर बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा येथील जाहीर प्रचार सभांत पंतप्रधानांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणाची सुरुवात हिंदुत्वाने करून अयोध्येचा उल्लेख केला.नितीश कुमार विद्यमान आणि भावी मुख्यमंत्री, असे सांगत मोदी म्हणाले की, गेल्या दीड दशकात बिहारने केेलेल्या प्रगतीमुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पोकळ आश्वासनांची ही वेळ नाही. बिहारला अंधकारातून बाहेर काढून इथवर आणले, अशा अनुभवी लोकांना पुन्हा निवडून देण्याची ही संधी आहे. विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचे जनतेशी कसे वर्तन राहिले, हे बिहारची जनता विसरणार नाही. खंडणी दिली तर ठीक, नाही तर अपहरण उद्योगाचा मालकीहक्क त्यांच्याकडे आहेच. तेव्हा त्यांच्यापासून सावध राहावे.  राजदच्या पूर्वीच्या राजवटीतील कारभाराचाही त्यांनी समाचार घेतला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी