ड्रीमच्या ग्रंथदिंडीत मतदार जागृती

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

सोलापूर : ड्रीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. चार हुतात्मा पुतळा चौकातून या ग्रंथदिंडीचा प्रारंभ महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते करण्यात आला.

Voters awakening in Dream's texts | ड्रीमच्या ग्रंथदिंडीत मतदार जागृती

ड्रीमच्या ग्रंथदिंडीत मतदार जागृती

लापूर : ड्रीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. चार हुतात्मा पुतळा चौकातून या ग्रंथदिंडीचा प्रारंभ महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्वागताध्यक्ष धर्मराज काडादी, कार्याध्यक्ष कुमार करजगी, डॉ. नसीमा पठाण, सुभेदार बाबुराव पेठकर, सुमन शिंदे, नाडगौडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौर आबुटे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा संमेलनामुळे सोलापुरातील युवकांना एक प्रेरणा मिळेल.
या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत विविध विषयांवरील संदेश सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रीय मतदार जागृती, पर्यावरण जागर, पाणी वाचवा संदेश, मुली वाचवा-देश वाचवा याबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या विचारांच्या घोषणांनी दिंडी लक्षवेधी ठरली.
या दिंडीत जय जवान जय किसान सैनिक स्कूल, चंडक हायस्कूल, सुरवसे हायस्कूल, कुचन प्रशाला, नागेश करजगी ऑर्किड कॉलेज, संभाजीराव शिंदे अध्यापक विद्यालय, ड्रीम आयएएस सेंटर, ओम बुक डेपो, दीपस्तंभ प्रकाशन जळगाव या संस्थांसह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले. आभार मुख्याध्यापिका कोंडा यांनी मानले. दिंडी यशस्वी करण्यासाठी सिद्धाराम यलशे?ी, सतीश पाटील, शाम पाटील, किरण पाटील, मल्लिकार्जुन हडपद, विवेक मेहेरकर, सागर मोरे, संगीता पाटील, प्रभाकर गायकवाड, स्नेहा कुंभार, रुचिता चव्हाण, स्नेहा देशमुख आदींनी पर्शिम घेतले.
फोटो ओळी
ड्रीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी हुतात्मा चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी महापौर सुशीला आबुटे, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, डॉ. नसीमा पठाण, कुमार करजगी, धर्मराज काडादी, बाबुराव पेठकर, सुमन शिंदे, नाडगौडा पाटील, काशिनाथ भतगुणकी आदी.

Web Title: Voters awakening in Dream's texts