Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:32 IST2026-01-07T17:30:22+5:302026-01-07T17:32:19+5:30
एका बस मागे जात असलेल्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिली. बस नियंत्रणाबाहेर गेल्याने रिक्षा दोन्ही बसेसच्या मध्ये चिरडला गेला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, जो बघून तुमचाही थरकाप होईल. डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली असून, पाठीमागून येणाऱ्या बसने कशापद्धतीने रिक्षाला चिरडले, हे दिसत आहे. भुवनेश्वरमध्ये ही घटना घडली आहे. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला.
भुवनेश्वरमधील रुपाली चौकात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये हा अपघात कसा झाला, हे स्पष्टपणे दिसत आहे. एका बस मागे रिक्षा चालली होती. त्याचवेळी पाठीमागून बस आली. रिक्षाच्या पाठीमागे असलेल्या बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यानंतर ही भयंकर घटना घडली.
३ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. रिक्षा समोर दिसत असूनही बसचालक वाहन पुढे पुढे नेत गेला. त्यानंतर रिक्षाला धडक बसली, तरीही बस पुढेच नेली. समोरची बस आणि पाठीमागची बस यामध्ये रिक्षा पूर्णपणे चिरडली.
One reckless driver can wipe out innocent lives and destroy multiple families in seconds. 💔
— Manas Muduli (@manas_muduli) January 6, 2026
Here is the dashcam footage from the bus that crushed an auto between two buses at Rupali Square, Bhubaneswar. pic.twitter.com/2pv5PaO3Qe
पाठीमागील बस समोर असलेल्या बसच्या अगदी जवळ गेली. त्यामुळे समोरच्या बसला धडक बसली आणि लोकांनाच्या हा अपघात लक्षात आला. पण, तोपर्यंत यात ६२ वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सांगितले की, रुपाली चौकातील सिग्नलवर ही घटना घडली. अम्मा बसने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. रिक्षा शाळेच्या बसच्या पाठीमागे चालली होती. यात बिनझनरपूर येथील विष्णू पात्रो या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. यात एकजण जखमी झाला आहे. नमिता प्रधान आणि रमानी नायक असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
रिक्षातील प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. नायक हे किरकोळ जखमी झाले होते, त्यांना उपचार करून सुट्टी देण्यात आली. दुसऱ्या व्यक्तीचा हात मोडला असून, डोक्यालाही मार लागला आहे.