'अभिनंदन, तुम्ही आजोबा झाला, राणाला मुलगा झाला'; ऐकताच भाजपा नेत्यानं हवेत केली फायरिंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:49 IST2021-02-16T17:40:59+5:302021-02-16T17:49:40+5:30
Jaunpur bjp leader video viral : या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

'अभिनंदन, तुम्ही आजोबा झाला, राणाला मुलगा झाला'; ऐकताच भाजपा नेत्यानं हवेत केली फायरिंग...
जौनपूर जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते दिनेश सिंह "बब्बू" यांना नातू झाल्याचं ऐकून खूपच खुश झाले. आजोबा झाल्याच्या आनंदात सगळे नियम धाब्यावर बसवत त्यांनी आपली लायसेंसची बंदूक चालवून फायरिंग केली. इतंकच नाही तर त्यांनी फायरिंग करण्याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दरम्यान काही वेळातच त्यांना हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे डीएम, एसपी ऑफिस दिनेश यांच्या घरापासून काही पावलांच्या अतंरावर आहे. तरिही कशाहीची पर्वी करता, कोणालाही न घाबरतात त्यांना दणादण फायरिंग करायला सुरूवात केली. भाजप नेते दिनेश सिंह यांनी हुसेनाबाद कॉलनीतील आपल्या घराच्या परिसरात फायरींग केली आहे. माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार
कुटुंबातील लोकांमध्ये उत्साह होता
ते गोळीबार करत असताना कुटुंबातील लोकही एकत्र उभे होते. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा त्यांनी पहिला गोळीबार केला तेव्हा कुटुंबाच्या मागे उभे असलेले लोकही आनंदी दिसत आहेत. पहिल्या शॉटवर गोळीबार होताच एका महिलेचा आवाज येतो. ती म्हणते की, सुन्नी… एक झाले. दुसरा शॉट होताच बाई म्हणाली की दोन झाले आहेत. व्हिडिओसह भाजप नेत्यानं लिहिले होते की सर्व वडीलधाऱ्यांना सलाम. आज मला आजोबा होण्याचा बहुमान मिळाला. राणाला एक मुलगा आहे. माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो