माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

By manali.bagul | Published: February 15, 2021 07:45 PM2021-02-15T19:45:53+5:302021-02-15T19:54:58+5:30

Viral News of ruelty man drags dog along road: राग आल्यानंतर प्राण्यांना हवी तशी वागणूक देण्यासाठी हे काही स्फॉट टॉय नाहीत. प्राण्यांच्या शरीरातही हाडं मासं असतात. त्यांनाही आपल्याप्रमाणेच वेदना होतात.

Animal cruelty man drags dog along road in kerala viral photo | माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

Next

मुकी जनावरं बोलू शकत नाहीत, याचा  गैरफायदा घेणं खूप चुकीचं आहे. सोशल मीडियावर प्राण्यांवरच्या अत्याचाराचे व्हिडीओ आणि फोटो सध्या मोठ्या संख्येनं समोर येत आहे.  माणुसकी नष्ट होत चाललीये का? असा प्रश्न हे फोटो पाहिल्यानंतर पडतो. राग आल्यानंतर प्राण्यांना हवी तशी वागणूक देण्यासाठी हे काही  स्फॉट टॉय नाहीत. प्राण्यांच्या शरीरातही हाडं मासं असतात. त्यांनाही आपल्याप्रमाणेच वेदना होतात. पण काही माणसं आपल्या शक्तीच्या  जोरावर प्राण्यांना इतका त्रास  देतात की, लोकांचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो. केरळच्या इड्डुक्कीमधून अशीच एक घटना समोर येत आहे. या फोटोमधून दिसून येतं की माणसानं क्रुरतेचा सर्वोच्च पातळी गाठली आहे. 

आधी मारलं मग फरपटत नेलं

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार इड्डुक्कीमध्ये एका माणसानं आपल्या कुत्र्याला दोरीनं बांधून जमीनीवरून फरपटत नेलं.  सिद्धार्थ सुगाथन नावाच्या व्यक्तीनं ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आहे. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आरोपीनं सगळ्यात आधी कुत्र्याला  २० मीटरपर्यंत फरपटत नेलं त्यामुळे कुत्रा पूर्णपणे जखमी झाला होता.

आरोपीला करण्यात आली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कत्ताप्पनाच्या आयटीआय जंक्शनचा रहिवासी असलेला ५१ वर्षीय मंडीयीलसाबू याला त्यांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात प्राण्याप्रती गैरवर्तन आणि क्रुरता दाखवल्याच्या नियमाअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीनं सगळ्यात आधी या कुत्र्यावर दांड्यानं हल्ला केला आहे. त्यानंतर दोरीनं बांधून खेचत नेलं आहे. माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

आता  कुत्र्याची स्थिती बरी आहे

पुढे त्यांनी सांगितले की, ''आम्ही लगेचच कुत्र्याला पशू रुग्णालयात दाखल केलं. आता त्याची अवस्था बरी आहे. आरोपीनं बचावासाठी सांगितले की, 'सगळ्यात आधी कुत्र्यानं आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.' दरम्यान डिसेंबरमध्येही एर्नाकुलम जिल्ह्यातील एका कुत्र्याच्या मालकाला अटक करण्यात आली होती. कारण त्यानं आपल्या पाळीव कुत्र्याला  दोरीनं बांधून  कारनं ५०० किलोमीटरपर्यंत खेचत नेलं होतं. काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

Web Title: Animal cruelty man drags dog along road in kerala viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.