"एक फोटो काढला अन्...", विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 13:08 IST2024-09-11T13:05:33+5:302024-09-11T13:08:51+5:30

Vinesh Phogat PT Usha : कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी आता पीटी उषा यांच्यावर आरोप केले आहेत. विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

vinesh phogat alleged that pt usha did politics over paris olympic | "एक फोटो काढला अन्...", विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

"एक फोटो काढला अन्...", विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

Vinesh Phogat Haryana Assembly election 2024 : कुस्तीपटू आणि काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी आता IOA च्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आल्यानंतर पीटी उषा यांनी विनेश फोगाट यांची भेट घेतली होती. भेटीचा एक फोटोही समोर आला होता. याच भेटीवरून विनेश फोगाट यांनी पीटी उषा यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप केला आहे. एक फोटो काढून पोस्ट केला आणि राजकारण केले, असे त्या म्हणाल्या.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट यांचे वजन वाढले होते. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम शरीरावर होऊन विनेश फोगाट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पीटी उषा यांनी विनेश फोगाट यांची भेट घेतली होती. त्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोबद्दल आता विनेश फोगाट यांनी आता मौन सोडत टीका केली. 

विनेश फोगाट पीटी उषा यांच्याबद्दल काय म्हणाल्या?

"मला माहिती नव्हते की, तिथे मला कोणता पाठिंबा मिळाला. पीटी उषा मॅडम भेटायला आल्या होत्या. एक फोटोही काढला गेला होता. जसे की राजकारणात बंद दाराआड बरेच काही घडत असते. त्याच पद्धतीने तिथेही (पॅरिस) राजकारण केले गेले. त्यामुळे माझे मन दुखावले गेले. नाहीतर खूप लोक होते, जे म्हणत होते की, कुस्ती सोडू नको", असे विनेश फोगाट म्हणाल्या.

त्या फोटोबद्दल बोलताना विनेश फोगाट यांनी पीटी उषा यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, "तुम्ही रुग्णालयात बेडवर आहात. बाहेर काय चालले आहे, हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आयुष्यातील सगळ्यात वाईट काळातून जात आहात. अशावेळी आम्ही तुझ्यासोबत असल्याचे दाखवता. तुम्ही मला न सांगता फोटो काढता."

"फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करता आणि सांगता की आम्ही तुझ्यासोबत आहोत. धीर असा दिला जात नाही. ते दिखावा होता, दुसरे काही नव्हते", अशी टीका विनेश फोगाट यांनी पीटी उषा यांनी घेतलेल्या भेटीवर केली. 

काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघातून दिली उमेदवारी

पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर विनेश फोगाट या राजकारणात पाऊल ठेवणार, अशी चर्चा सुरू झाली होती. हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केली. त्यांच्याविरोधात भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. 

Web Title: vinesh phogat alleged that pt usha did politics over paris olympic